तुळशीचे बनी जनी उकलिते वेण | Tulasiche Bani Jani Ukalite Veni

तुळशीचे बनीं ।जनी उकलिते वेणी ॥१॥
हातीं घेऊनियां लोणी ।डोई चोळी चक्रपाणि ॥२॥
माझे जनीला नाहीं कोणी ।ह्मणुनी देव घाली पाणी ॥३॥
जनी सांगे सर्व लोकां ।न्हांऊं घाली माझा पिता ॥४॥