Showing posts with label राधे तुला पुसतो घोंगडीवाला ||. Show all posts
Showing posts with label राधे तुला पुसतो घोंगडीवाला ||. Show all posts

राधे तुला पुसतो घोंगडीवाला | Radhe Tula Pusato Ghogadivala

राधे तुला पुसतो घोंगडीवाला | घोंगडीवाला कांबळीवाला
जमवुनि पोरें गेला यमुनेच्या तिरीं | वांटितो गोपाळकाला
रात्री माझ्या मंदिरीं आला | निरोप सांगुनि गेला
गळां वैजयंती माळा हाति घेऊनियां वेणू | नेसुनि पितांबर पिंवळा
जनी म्हणे विठू हा धाला | गळां वैजयंती माळा