Showing posts with label अजि सोनियाचा दिनु ||. Show all posts
Showing posts with label अजि सोनियाचा दिनु ||. Show all posts

अजि सोनियाचा दिनु | Aaji Soniyacha Dinu

अजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥
हरि पाहिला रे । सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥
दृढ विटे मन मुळी । विराजित वनमाळी ॥३॥
बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥४॥
कृपासिंधु करुणाकरू । बाप रखमादेविवरू ॥५॥