Showing posts with label कशी जाऊं मी वृंदावना ||. Show all posts
Showing posts with label कशी जाऊं मी वृंदावना ||. Show all posts

कशी जाऊं मी वृंदावना | Kashi Javu Mi Vrundavana

कशी जाऊं मी वृंदावना । मुरली वाजवी ग कान्हा ॥१॥
पैलतिरीं हरि वाजवी मुरली । नदी भरलीं यमुना ॥२॥
कांसे पीतांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥३॥
काय करू बाई कोणाला सांगूं । नामाची सांगड आणा ॥४॥
नंदाच्या हरिनें कौतुक केलें । जाणे अंतरिच्या खुणा ॥५॥
एका जनार्दनी मनी म्हणा । देवमाहात्म्य कळे ना कोणा ॥६॥