भाबांवसी कां रे माझें म्हणसी । कोण हे कोणासी कामा आले ॥१॥
घेई तूं अनुभव कोणाचे ते कोण । अंतकाळीं जाण पारखे होती ॥२॥
जवळी असतां धन कांही रुका । तेव्हा म्हणती सखा दादा भाई ॥३॥
हीनपणें म्हणती अभागी करंटा । जन्मला फुकटा मारतां बरें ॥४॥
भानुदास म्हणे ऐसें हे जन । परी माझें जाण करिती वायां ॥५॥