सगुणाची सेज निर्गुणाची बाज । सांवळी विराजे कृष्ण-मूर्ति ॥१॥
मन गेले ध्यानीं कृष्णचि नयनीं । नित्यता पर्वणी कृष्ण-सुखें ॥२॥
हृदय-परिमळी कृष्ण मनो-मंदिरीं । आमुचां माज-घरीं कृष्ण बिंबे ॥३॥
निवृत्ती निघोट ज्ञानदेवा वाट । नित्यता वैकुंठ कृष्ण-सुखें ॥४॥