Showing posts with label हरिभजनाविण काळ घालवू नको रे ||. Show all posts
Showing posts with label हरिभजनाविण काळ घालवू नको रे ||. Show all posts

हरिभजनाविण काळ घालवू नको रे | Hari Bhajana Vin Kal Ghalavu Nako Re

हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥१॥
दोरीच्या सापा भिवुनी भवा । भेटी नाही जिवा-शिवा ।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥२॥
विवेकाची ठरेल ओल । ऐसे की बोलावे बोल ।
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ॥३॥
संत संगतीने उमज । आणुनि मनी पुरते समज ।
अनुभवावीण मान हालवू नको रे ॥४॥
सोहिरा म्हणे ज्ञानज्योती । तेथ कैचि दिवस-राती ।
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे ॥५॥