Showing posts with label उभारिला ध्वज ||. Show all posts
Showing posts with label उभारिला ध्वज ||. Show all posts

उभारिला ध्वज तिही लोकावरी | Ubharila Dhvaj Tinhi Lokavari

उभारिला ध्वज तिही लोकावरी । ऐसी चराचरी किर्ति ज्यांची ।। १ ।।
ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञान दीप्ति कळा ।। २ ।।
धरुण सगुणरुपे केली क्रीडा । बोलविला रेडा निगमवाचे ।। ३।।
बैसुनिया वरी चालविली भिंती । चांगदेवाप्रती दीली भेटी ।। ४ ।।
मग वास केला अलंकापुरासी । पिंपळ द्वाराशी कनकाचा ।। ५ ।।
नीळा म्हणे ज्यांच्या नामे करीता घोष । नाटळती दोष कळिकाळाचे ।। ६ ।।