नाम फुकाचे फुकाचे | Naam Fukache Dev Pandharirayache
नाम फुकाचे फुकाचें । देवा पंढरीरायाचें ।।१।।
नाम अमृत हे सार । ह्रदयीं जपा निरंतर ।।२।।
नाम संतांचे माहेर । प्रेम सुखाचें आगर ।।३।।
नाम सर्वांमध्ये सार । नरहरि जप निरंतर ।।४।।
Newer Post
Older Post
Home