संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत | Sant Bhar Pandharit Kirtanacha Gajar Hot
संतभार पंढरीत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥
तेथ असे देव उभा । जैसी समचरणांची शोभा ॥२॥
रंग भरे कीर्तनात । प्रेमे हरिदास नाचत ॥३॥
सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचा जो जिव्हार ॥४॥
ऐशा संतां शरण जावें। जनी म्हणे त्याला ध्यावें ॥5॥
Newer Post
Older Post
Home