पंढरी ये नगरी जणू वैकुंठ | Pandhari ye Nagari Janu Vaikunth Bhuvari

पंढरी ये नगरी जणू वैकुंठ भुवरी विठूरायाची नगरी ॥१॥
भोवती भिवरेचा वेढा | मध्ये पंढरीचा उढा ॥2॥
गस्त फिटे चौकोनी । टाळ मृदुंगाचा ध्वनी ॥3॥
ऐसे स्थळ नाही कोठे | तुकयाला विठ्ठल भेटे ॥4॥