यारे नाचू प्रेमानांदे विठ्ठल नामाचिया छंद|Ya re Nachu Premanande Vithhal Namachiya Chhande

या रे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद ॥धृ॥
जाऊ म्हणती पंढरीची वाटे, कळीकाळा भयं वाटे ॥१॥
चंद्रभागे घडले स्नान, याम लोकी पडली हान ॥2॥
झाली पुंडलिक भेटी, पूर्वज आनंदले वैकुंठी ॥3॥
आता राऊळासी जाता, झाली जीवाची मुक्तता ॥4॥
विष्णुदास नामा म्हणे, आता नाही येणे जाणे ॥5॥