कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया | Kothe Guntalasi Dvarakcha Rana

कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ का सखया लावियेला ॥१॥
दिनानाथ ब्रीद सांभाळी आपुले । नको पाहो केले पापपुण्य ॥2॥
पतितपावन ब्रीदे चराचर । पातकी अपार उद्धरिले॥3॥
तुकयाबंधु म्हणे द्रोपदीचा धावा । केला तैसा मला पावे आता ॥4॥