ऐकुनी वेणुचा नाद | Aikuni Venucha Naad

ऐकुनी वेणुचा नाद । लागला नामाचा छंद ॥१॥
निघाली लगबग पाण्याला । रिकामा घेवोनीया डेरा ।। गिरधर गोविंद गोविंद ॥२॥
निघाली धेनु चाराया । वासरे करोनिया गोळा ।। वाजवी पावा गोविंद ॥३॥
नामा म्हणे अहो केशवराज । नाम घ्या श्री कृष्ण गोविंद । गवळणी झाल्या मती मंद ॥४॥