विठ्ठल आवडी प्रेमभावो | Vithhal Avadi Prembhavo

विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥
तुटला हा संदेहो । भवमूळव्याधीचा ॥२॥
ह्मणा नरहरि उच्चार । कृष्ण हरि श्रीधर ।
हेंचि नाम आह्मां सार । संसार तरावया ॥३॥
नेघों नामाविण कांहीं । विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा ह्मणे तरलों पाहीं । विठ्ठल विठ्ठल ह्मणतांचि ॥४॥