माझा भाव तुझे चरणी | Maza Bhav Tuze Charani

माझा भाव तुझे चरणीं । तुझें रूप माझे नयनीं ॥१॥
सापडलों एकामेकां । जन्मोजन्मीं नोहे सुटका ॥२॥
त्वां मोडिली माझी माया । मी तो जडलों तुझिया पायां ॥३॥
नामा ह्मणे गा सुजाणा । सांग कोणे ठकविलें कोणा ? ॥५॥